बेळगाव : कोरे गल्ली पंच यांच्याकडून शहापूर भागात म. ए. समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा कोरे गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंगवाडी, आनंदवाडी भागात प्रचार करून कोरे गल्ली शहापूर येथे कॉर्नर सभा घेऊन पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी कोरे गल्लीचे सरपंच पांडुरंग शिंदे, चंद्रकांत कोंडूसकर, पंच सोमनाथ कुंडेकर, शांताराम गावडोजी, सागर हवळाणाचे, शांताराम मजुकर, कल्लापा हंडे, शिवाजी केरवाडकर, शिवाजी मजुकर त्याचबरबरीने आजी-माजी नगरसेवक, शिवसेना नेते राजकुमार बोकडे, राजाराम मजुकर, मनोहर शहापूरकर, शिवाजी उचगावकर, संजय गवडोजी, प्रभाकर पाटील, बाळू कुरळे, बापू पाटील, युवराज भांदुर्गे, गणपत ढवळी यासह ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजीत हावळाणाचे यांनी सूत्रसंचालन तर अभिजीत मजुकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta