बेळगाव : केळकर बाग बेळगाव येथील युवक अभिषेक जाधव यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वयक म्हणून काम नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांची महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.
अभिषेक जाधव हे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे. अभिषेक जाधव यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे सल्लागार म्हणून कार्य केले आहे. यापूर्वी देखील झी मीडिया ग्रुपचे सुभाषचंद्र चंद्रा यांचे बिझनेस मीडिया आणि मनोरंजन विभाग प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्य सांभाळलेला आहे.
अभिषेक जाधव हे केळकर बाग येथील सामाजिक कार्यकर्ते जत्तीमठ देवस्थानचे अध्यक्ष दत्ता जाधव यांचे चिरंजीव आहेत. महाराष्ट्र शासनाचे दिल्लीतील समन्वय सीमा भागातील मराठी तरुण करणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्वथरातून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta