Tuesday , March 3 2026
Breaking News

सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नामुळे नाला सफाई सुरू

Spread the love

 

बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील तुंबलेल्या नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाला गेला काही महिन्यांपासून स्वच्छते अभावी तुंबला होता. तुंबलेल्या या नाल्यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी नाला स्वच्छतेसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. अलीकडेच त्यांनी त्या संदर्भात निवेदन देखील सादर केले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या मागणीची दखल घेत महापालिकेकडून आज सकाळी 8 वाजता सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याच्या सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून ते प्रसाद चौगुले यांना धन्यवाद देत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *