
बेळगाव : शहरातील शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन कार्यक्रम नुकताच मोठ्या भक्तीभावाने उत्साहात पार पडला.
बेळगाव शहरातील आराधना संस्थेचे अध्यक्ष सुनील चौगुले यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थांचे वंशज श्री श्री निलेश महाराज आणि इतर महाराजांच्या उपस्थितीत काल बुधवारी या पादुका पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांताई वृद्धाश्रमा जवळ असलेल्या परिसरातील, बामणवाडी व कुठलवाडी या भागातील वारकरी मंडळींनी टाळाच्या गजरामध्ये पादुकांचे स्वागत केले. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पुजन (अभिषेक) यतीन कुलकर्णी यांनी केले.
श्री समर्थ पादुका पूजन कार्यक्रमानिमित्त शांताई वृद्धाश्रमामध्ये एक तास भजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बेळगाव शहरातून सुनील आपटेकर, सिद्धार्थ उंद्रे, संतोष ममदापूर, वसंत बालिका , अरुण पोटे आदींसह बहुसंख्य भाविक आणि हितचिंतक उपस्थित होते. सर्वांनी पादुकाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वालवालकर, अरुण पोटे, मारिया मोरे, ॲलन मोरे, दत्ता घोरपडे आणि इतर मंडळींनी परिश्रम घेतले. शेवटी शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी आभार प्रकट केले.
Belgaum Varta Belgaum Varta