
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. केपीसीसी कार्याध्यक्ष व नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या आमदारांचे शिष्टमंडळ सध्या राजधानी दिल्लीत ठाण मांडून आहे. या शिष्टमंडळात सतीश जारकीहोळी यांच्यासोबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगल आमदार महांतेश कौजलगी, कुडचीचे महेंद्र तम्मनवर, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांचा समावेश होता.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विजयी झालेल्या आमदारांना, मंत्री सतीश जारकीहोळी यांना शुभेच्छा दिल्या. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार महांतेश कौजलगी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta