Monday , September 21 2026
Breaking News

नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा नियती फाऊंडेशनच्यावतीने सत्कार

Spread the love

 

खानापूर : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा आज खानापूर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच खानापूर भाजपच्या महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. या यशाबरोबरच जबाबदारी देखील मोठी आहे. येणाऱ्या काळात खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण व आपले सर्व सहकारी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यासोबत नेहमीच असेन.
यावेळी खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा नेते आनंद पाटील, अर्जुन गावडा, सागर तिनईकर, रोहिणी पाटील, अर्चना पाटील, सतीश परिश्वावाडकर यांच्यासह खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *