बेळगाव : माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित या सत्कार समारंभात माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते बी.एड. परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन केलेल्या दीपा जयराम हवालदार या विद्यार्थिनीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अॅड. मारुती कामाण्णाचे यांच्यासह दीपाचे पालक आणि इतर मंडळी हजर होती. कारभार गल्ली, वडगाव येथील विणकर जयराम आप्पाजी हवालदार यांची कन्या दीपा ही शहरातील सागर बी.एड. कॉलेज येथे शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असतानाच ती आपल्या वडिलांना विणकर व्यवसायात मदत करत होती. या पद्धतीने काम करत शिक्षण घेणार्या दीपाने यंदाच्या बी.एड. परीक्षेमध्ये 87.4 टक्के गुण संपादन करून घवघवीत यश संपादन केले. त्याचप्रमाणे सागर कॉलेजमध्ये तिने सहावा क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल माजी आमदार नंदिहळ्ळी यांनी सत्कार करून तिला प्रोत्साहित करण्याबरोबरच भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta