Wednesday , March 4 2026
Breaking News

वडगावात आज शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

Spread the love

 

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परंपरेनुसार वडगाव परिसरात शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. वडगाव परिसरात शहराच्या एक दिवस आधी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा शहराची शनिवारी (दि. २७) चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शुक्रवारी वडगाव परिसरातील चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत नऊ चित्ररथ सहभागी होणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून मिरवणुकीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध सजिव देखाव्यांची तयारी केली आहे. पारंपरीक मऱ्हाटमोळ्या वातावरणात ही मिरवणूक निघणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *