बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी शुक्रवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी १५ जुलै आणि ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने २५ मे २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी समिती नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करून दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलिस ठाण्यात म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, अरविंद पाटील, दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, हणमंत मजुकर, रत्नप्रसाद पवार, गणेश दड्डीकर, सूरज कणबरकर, राजू बिर्जे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, निंगोजी हुद्दार, मदन बामणे, महेश जुवेकर, संजय शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावर दुसरे जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. म. ए. समितीकडून ॲड. महेश बिर्जे, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर काम पाहत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta