बेळगाव : राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचे नवे मंत्री म्हणून शपथ घेतलेले सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावात येणार आहेत.
एकत्र येणार्या दोन्ही मंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले असून शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
20 मे रोजी सतीश जारकीहोळी आणि 27 मे रोजी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या सरकारचे मंत्री झाल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच बेळगावात येत आहेत. रविवारी सकाळी 10.30 वाजता दोघेही बेळगाव विमानतळावर उतरतील.
विमानतळावर दोन्ही मंत्र्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 3.30 वाजता दोन्ही मंत्री जिल्हा काँग्रेस कार्यालयात येणार असून तेथे त्यांची बैठक होणार आहे. नंतर मंत्री कित्तूर राणी चन्नम्मा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बी.आर. आंबेडकर, संगोळी रायण्णा, महात्मा गांधी आदी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहरात मिरवणूक काढतील.
Belgaum Varta Belgaum Varta