बेळगाव : मूळचे इनाम बडस गावचे रहिवासी असलेले कवि, लेखक, पत्रकार प्रा. शंकर जाधव यांना बेळगावच्या राणी चेन्नम्मा विद्यापीठाची (आरसीयु) डॉक्टरेट अर्थात विद्यावाचस्पती पदवी जाहिर झाली आहे. “1960 नंतरच्या कोकणातील लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे व्यासंगी प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांचे प्रा. जाधव यांना मार्गदर्शन लाभले. कोकणातील प्रतिभावंत लेखिकांचे साहित्य काहिसे दुर्लक्षित होते. त्या लेखिकांच्या साहित्याची समीक्षकानी फारसी दखल घेतली नाही याची प्रा. शंकर जाधव यांना खंत होती. त्यामुळे त्यानी हा विषय निवडला. कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथे मराठी पद्वयुत्तर विषयात ते विद्यापीठात पहिले आले होते. त्यामुळे त्यांना ‘रावसाहेब गोगटे गोल्ड मेडल’ मिळाले आहे. अलिकडेच त्यांचा ‘शब्दवेणा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. गेली 25 वर्षे कोकणातील ‘रत्नागिरी टाइम्स’ या वृत्तपत्रात उपसंपादक या. पदावर कार्य केलेले प्रा जाधव यांनी बेळगाव ‘तरुण भारत’ मधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. प्रा. शंकर जाधव यांना डॉ. विनोद गायकवाड, डॉ. मनीषा नेसरकर, डॉ. संजय कांबळे, डॉ. मुत्तवाली, राजाराम ओऊळकर, कवि वाय. पी. नाईक, डॉ. सुरेश जोशी यांचेही मार्गदर्शन लाभले.
प्रा. शंकर जाधव हे गेली 24 वर्षे रत्नागिरीतील मराठा मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापन करीत आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांच्या मित्रांनी इनाम बडस गावी प्रा. जाधव यांची खास भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी वाय. पी. नाईक, आर. के. ओऊळकर, पी. आर. गावडे, डी. डी. मोरे, नाना मजुकर, यशवंत मोरे, रवळु मोरे, सौ.जाधव, पांडुरंग मोरे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta