बेळगाव : 1 जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी व इतर भागात झालेल्या कन्नड भाषा सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना 1 जून 2023 रोजी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तालुका म. ए. समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मराठी भाषिकांनी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे सकाळी ठीक 8=30 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर व खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta