बैलहोंगल : मालमत्तेच्या वादातून एका भावाचा खून झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात रविवारी घडली.
तिगडी गावातील रहिवासी शंकर खनगावी याचा खून शंकर खनगावी या भावानेच केल्याची माहिती मिळाली आहे. मृत सुरेश हा माजी सैनिक असून तो सध्या शेतमजुरी करून राहत होता.
आरोपी शंकर खनगावी आणि खून झालेला सुरेश यांच्यात मालमत्तेच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन सुरेशवर शंकर याने चाकूने वार केल्याने सुरेश खनगावी जागीच मृत झाला तर तेथे उपस्थित असलेले सदा खगगावी हे गंभीर जखमी झाले असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बैलहोंगळ स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta