बेळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिकेत आज बुधवारी विकास आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजना अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर सौंदर्यकरणाचे कामही सुरू आहे याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर शहरात प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावे अशी सूचना करतानाच, बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याची आठवण काढून देताना, बेळगाव शहरात एक कोटी रुपये खर्च करून छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारण्याची सूचना केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta