बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आयोजिलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक निलेश शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रामपंचायतच्या सदस्या रेणू गावडे, प्रमुख वक्त्या म्हणून टिळकवाडी बेळगाव येथील नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या प्राचार्या प्रीती पाटील, प्रमूख वक्ते प्राध्यापक निलेश शिंदे, तेजस्विनी कांबळे, आर.के. ओऊळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, सागर भोसले पवन कांबळे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे यांच्या मातोश्री गंगुबाई मोरे, वनिता कणबरकर, प्रतीक्षा येळूरकर, प्रीती पाटील आदींच्या हस्ते विविध प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. निलेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
यावेळी केदारी कनबरकर, मोनाप्पा गावडे मोरे, पांडुरंग सातेरी मोरे, अविनाश कांबळे, यशवंत मोरे, कल्लाप्पा येळूरकर, मुकुंद ओऊळकर, गोपाळ जाधव, मंगांना कार्वेकर तसेच गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक शिक्षणप्रेमी आणि मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते. स्वागत संगीता कनबरकर, प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक, पाहुण्यांचा परिचय आरती मोरे आणि कांचन सावंत, सूत्रसंचलन सुरज मोरे व दौलत कनबरकर तर आभार ॲड. मनोहर मोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta