बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सीमा भागातील मराठी भाषिक जनतेचे आधार स्तंभ श्री. शरदरावजी पवार यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या थोर परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. महाराष्ट्र सरकारने या धमकीची गंभीर दखल घेऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta