Tuesday , March 3 2026
Breaking News

शिक्षकाचा दारु पिऊन शाळेत धिंगाणा!

Spread the love

 

बेळगाव : शिक्षक हे विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करून वाट दाखवण्याचं काम करता असतात परंतु बेळगाव शहरातील शाळेमध्ये शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी एक धकादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. यात शाळेतील शिक्षक चक्क वर्गात दारु पिऊन आल्याचे दिसून येतयं. या घटनेचे फोटो व चित्रिकरण स्थानिकांनी केलं होतं. शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. या दारुड्या शिक्षकाची करामत पाहून विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे नशेबाज शिक्षकावर कारवाईची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. शाळा प्रवेशाच्या दिवशी याच शिक्षकाने विद्यार्थ्यांचं स्वागत केलं होतं. त्यानेच आठ दिवसानंतर दारु पिऊन शाळेसमोर धिंगाणा घातल्याचं पाहून विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

हे सगळं एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून आता संपूर्ण बेळगावमध्ये या शिक्षिकाचा व्हिडीओ चर्चेत आलाय. अनेक व्हाट्सएप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये या व्हिडीओमुळे सवाल उपस्थित केले जात आहेत. या शिक्षकाची तक्रार घेण्यास पोलिसांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाजवळील सरकारी मराठी शाळा क्रमांक 12 मध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेतील कन्नड विषयाच्या शिक्षकाने प्रमाणाबाहेर दारु ढोसली होती. सकाळी मुलांना सोडण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी त्या शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी त्याला पालकांशी नीट बोलताही येत नव्हते.
दारु ढोसली नाही असा दावा तो करू लागला. मात्र तुमच्या तोंडातून दारुची वास येतेय असे सांगून पालकांनी त्याला धारेवर धरले. त्यावेळी तो शाळेतून पळाला असता त्याला पुन्हा पकडण्यात आले. आता शिक्षण खाते यावर काही कारवाई करणार का शिक्षकाच्या या असभ्य, नियमबाह्य वर्तनावर पांघरून घालणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *