बेळगाव : वडगाव-शहापूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. आर्थिक वर्ष काळात संस्थेला 9 लाख 60 हजार 642 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी दिली.
संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला बांधकाम व्यावसायिक राजेश हेडा व महेश फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बैठकीत कल्याणी सपकाळ यांनी नफा-तोटा पत्रक सादर केले. संस्थेच्या व्यवस्थापिका विद्या उच्चुकर (भातकांडे) यांनी वार्षिक ताळेबंद सादर केला. संचालक जयकुमार पाटील यांनी संचालक मंडळाच्या शिफारशींची नफा विभागणी सादर केली. चेअरमन संदीप खन्नुकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक सादर केले.
त्याचबरोबर सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर केला. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.
बैठकीला उपस्थित प्रमुख अतिथी राजेश हेडा आणि महेश जाधव यांनी गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळातही वेदांत सोसायटीने उत्कृष्टपणे केलेल्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन अमर चिल्लाळ, संचालक कृष्णा सायनेकर, रमाकांत कारेकर, ज्ञानेश्वर सायनेकर, राहुल अडके, जयकुमार पाटील, डॉ. संपतराव पाटील, अॅड. सोमनाथ धामण्णावर, बाबासाहेब भेकणे, संचालिका सरस्वती होसुरकर, सल्लागार जयवंत खन्नुकर, प्रकाश सुळेभावी, रामकृष्ण बाळकर, अॅड. सागर खन्नुकर, श्रीधर खन्नुकर तसेच कुरुंदवाड बँकेचे संचालक वैजनाथ बिर्जे, नेताजी सोसायटीचे डी. जी. पाटील, साई सोसायटीच्या संचालिका आरती पोरवाल, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सामाजिक कार्यकर्ते मदन बामणे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. प्रकाश सुळेभावी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …