खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील बॅडमिंटन असोसिएशन कोर्ट येथे फ्रेंड्स बॅडमिंटन क्लब यांच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिल्या गटात ४० वर्षाखालील तर दुसरा गटात ४० वर्षा गटावरील गटात तर महिलांसाठी ओपन गट अशा विविध गटात स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
यास्पर्धेतील विजयी स्पर्धक खालील प्रमाणे
मुलीच्या गटात प्रथम अश्विनी पांडूरंग कुंब्राळकर, व्दितीय क्रमांक श्रध्दा भरमकर,
४० वर्षावरील गटात प्रथम क्रमांक टी. बी. मोरे, व राॅबर्ट गोन्साल्विस
व्दितीय क्रमांक राजेंद्र मोटर व डाॅक्टर डी. ई. नाडगौडा,
त्याच प्रमाणे बेस्ट स्मॅशर म्हणून टी. बी. मोरे, तर बेस्ट डिफेंडर म्हणून राॅबर्ट गोन्साल्विस यांना गौरवण्यात आले.
४० वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक राहूल एफ. पाटील, व विनोद कदम, व्दितीय सागर कोडोली व संजय कारेकर तसेच बेस्ट स्मॅशर म्हणून भूषण पाटील, व बेस्ट डिफेंडर म्हणून गौरीश सोनाली, यांना गौरविण्यात आले.
यास्पर्धा पार पाडण्यासाठी बॅडमिंटन असोसिएशनचे विद्यमान चेअरमन व मेंबर याचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टी. बी. मोरे यांनी केले. तर आभार राॅबर्ट गोन्साल्विस यांनी मानले. यावेळी बॅडमिंटन शौकीनानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …