Wednesday , March 4 2026
Breaking News

अपघातात जखमी झालेल्या युवकाचे निधन

Spread the love

 

बेळगाव : खानापूर जवळ झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शुभम लक्ष्मीकांत जाधव रा. शास्त्री नगर बेळगाव बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

खानापूर येथून येत असतांना गेल्या गुरुवारी 8 जून रोजी हत्तरवाड जवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात शुभम गंभीर जखमी झाला होता अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मयत युवक हा मूळचे फुलबाग गल्ली व सध्या शास्त्रीनगरचे रहिवासी जुन्या काळातील तंबाखू व्यापारी लक्ष्मीकांत जाधव यांचा चिरंजीव होता. इस्पितळात उपचाराचा उपयोग न झाल्याने शुभम याचे आज बुधवारी निधन झाले आहे.

त्याच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता शास्त्रीनगर येथील निवासस्थानापासून शहापूर स्मशानभूमीकडे निघणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *