बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृत महोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दि. १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. त्यांनी आजवर झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या चर्चेत ऍड. सुधीर चव्हाण, कॉ. सुभाष कंग्राळकर, प्रा. दत्ता नाडगौडा, अनिल आजगांवकर, कॉ. कृष्णा शहापूरकर, शिवलीला मिसाळे यांनी भाग घेऊन सूचना केल्या.
आत्तापर्यंत बेळगाव, खानापूर, चंदगड, कोल्हापूर या परिसरातील सर्व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रणे पाठविण्यात आलेली आहेत, अशी माहिती उपस्थितांनी दिली. बेळगाव बार असोसिएशन, आयटकप्रणित कामगार संघटनांना तसेच बेळगावातील बँका, सोसायट्या आणि सहयोगी डावे पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे पोहोचली असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यात यावा आणि ७.३० वाजेपर्यंत तो संपवावा. म्हणजे परगावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांना घरी पोहोचणे सोपे व सोयीचे होईल अशी सूचना मांडण्यात आली. पुढील चार दिवस सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या संपर्कात असावे. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज सायंकाळी गिरीश कॉम्प्लेक्समधील कार्यालयात जमावे असे आवाहन आनंद मेणसे यांनी केले.
प्रमुख उपस्थितीत फार असोसिएशनचे उपाध्यक्ष कायदेतज्ञ सल्लागार ॲड. सुधीर चव्हाण, प्रा दत्ता नाडगौडा, अनिल अजगावकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर , विलास अध्यापक, प्रा निलेश शिंदे, चंद्रकांत मजूकर, सुभाष कंग्राळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत संदीप मुतगेकर यांनी केले. प्रास्ताविक कृष्णा शहापूरकर यांनी केले. सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. आभार शेखर पाटील यांनी मांडले.
बैठकीला प्रभावती शहापूरकर, सईद मोकाशी, अनिल पाटील, पावशे, गोपाळ शहापूरकर, गायत्री गोणबरे, दीपिका जाधव, अर्जुन सांगावकर, महेश राऊत, निलेश खराडे, मनोहर सांबरेकर, असलमन खान, शामल तूडयेकर, खुर्शिदा शैलेशकर, सई पाटील, सी.ए. बिदनाळ, संजय सातेरी अशोक अलगोंडी, अजय सातेरी, आनंद कानविंदे, तसेच व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta