बेळगाव : मान्सून लांबल्यामुळे बेळगाव शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जलाशयातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे शहर पाणीपुरवठ्यात 15% कपात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरातील कुपनलिका, विहीर व हातपंप यांचाच आधार बेळगावकरांना राहणार आहे.
कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ व एल अँड टी कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील 786 कुपमनलिका, ६८ विहिरी व 139 पंपांचा वापर पाणी टंचाई काळात होऊ शकतो. याशिवाय संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन कृती आराखडा हे तयार केला आहे. त्यानुसार हिडकल जलाशयातील पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली जाणार आहे. ते पंधरा टक्के पाणी लक्ष्मी टेकडी येथील शुद्धीकरण प्रकल्पात पाठवले जाणार आहे.त्यामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याचा उपसा कमी झाला तरी हिडकल जलाशयातील पाण्याच्या माध्यमातून तुट भरून काढली जाणार आहे. पाणीपुरवठ्याची वेळापत्रक ही एका दिवसाने वाढविले जाणार आहे.