
येळ्ळूर : टाळ मृदंगाचा गजर, माऊली- माऊली नामाचा जयघोष, करीत भक्तीमय वातावरणात, ओठी ज्ञानोबा तुकोबाचे नाव घेत मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साही वातावरणात येळ्ळूर येथील नेताजी मंगल कार्यालयापासून, वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर- धामणे ते पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज शनिवार (ता. 17) रोजी दुपारी एक वाजता झाले. तत्पूर्वी दिंडीतील भाविकांनी विठू नामाचा गजर करीत येळ्ळूरमध्ये सुद्धा फेरी काढली. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता येळ्ळूरमधून फिरून दिंडी नेताजी मंगल कार्यालय परमेश्वर नगर या ठिकाणी पोहोचली, त्या ठिकाणी दिंडीचे स्वागत नेताजी नेताजी मंगल कार्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले, पालखीचे पूजन नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते पार पडले. पालखीमध्ये चालणाऱ्या मानाच्या अश्वाचे पूजन नेताजी सोसायटीचे संचालक प्रा. सी. एम. गोरल, के. एन. पाटील, रविंद्र गिंडे व सी. एम. उघाडे यांच्या हस्ते झाले. नेताजी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने कार्यालयामध्ये दिंडीमध्ये चालणाऱ्या सर्व भाविक भक्तासाठी चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात सोसायटीच्या संचालक मंडळाने व कर्मचारी वर्गाने सर्व वारकरी भाविकांना व भगिनींना चहा व नाश्त्याची व्यवस्था केली. त्यानंतर दिंडी नेताजी मंगल कार्यालयापासून अवचारहट्टी, देवगणहट्टी, धामणे, जुने बेळगाव, काकती, यमकनमर्डी, अंकली, कावटेमहांकाळ, सांगोला, कासेगाव असे करीत ही दिंडी गुरुवार (ता. 29) रोजी आषाढी एकादशी रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. दिंडी चालक ह. भ. प. मारुती सांबरेकर महाराज (धामणे), दिंडीचे अध्यक्ष ह. भ. प. बाळू केरवाडकर, ह. भ. प. मोहन खांबले, येळ्ळूर ग्रामपंचायत माजी सदस्य अजित पाटील, येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष तानाजी हलगेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, सतीश देसुरकर, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक प्रा. सी. एम. गोरल, के. एन. पाटील, रवींद्र गिंडे, किरण गिंडे, सी. एम. उघाडे, हणमंत पाटील, चंद्रकांत इंजल, गणपती हट्टीकर, भोमाणी छत्र्यांण्णावर, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवी कणबरकर, गुंडू चिट्टी, जयवंत मंगणाकर, सागर यरमाळकर, जोतिबा गोरल, जोतीबा पाटील, सौ. कांचन पाटील, संगीता दणकारे यांच्यासह अनेक भक्तमंडळी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta