Monday , September 21 2026
Breaking News

पत्नीची हत्या करण्यासाठी खरेदी केली पिस्तूल; पतीला अटक

Spread the love

 

बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीला ठार करण्यासाठी गावठी कट्टा घेवून जाणाऱ्या पतीला सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. सचिन बाबासाहेब रायमाने (वय 34, रा. इंदिरानगर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सचिन रायमाने हा पत्नी आणि दोन मुलांसमते बेळगावच्या चिक्कोडी येथे राहण्यास आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या रागातून त्याने पत्नीला ठार मारण्याचे योजले होते.
सांगलीतील कुपवाडमध्ये गावठी कट्टा मिळत असल्याचे समजल्यानंतर तो कुपवाडमध्ये आला होता. त्याने कुपवाडमधून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतून विकत घेतले. त्यानंतर तो चिक्कोडीकडे निघाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून मिरज रेल्वे स्थानकाबाहेर अटक केली. त्याच्याकडून 55 हजार रुपयांचे गावठी कट्टा आणि 500 रुपयांचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *