बेळगाव : जिल्ह्यातील बेळगाव डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस सेंटर कडून शनिवारी सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विविध शासकीय योजना या सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. पण कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून सेवा सिंधू सर्विस गेल्या एक वर्षापासून मागील शासनाने बंद केली आहे. तरी नवनिर्वाचित शासनाने सेवासिंधू ही सर्विस कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थितीत संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र बदरगडे, उदय बरबरी, सुनील जाधव, शकील मुल्ला, मृत्युंजय मंत्रनावर, समिउल्ला मुल्ला, हमिद इनामदार, कामांना चौगुले, संजय मैशाळे, यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta