बेळगाव : बेळगाव वडगांव विष्णू गल्लीतील निजामिया बैतूलमाल आणि वेलफेर ट्रस्टतर्फे गरजू लोकांच्या साठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वडगांव निजामिया जामिया सुन्नत जमातचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. हे रक्तदान शिबिर केएलई संस्थेच्या रक्तपेढीच्या सानिध्यात संपन्न झाले.
वडगांव मधील अनेक समाजातील लोकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला होता. या रक्तदान शिबिरात 113 जणांनी आपले रक्तदान दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना अहमद नदाफ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. उर्दू शाळेच्या मुलीनी स्वागत गीत प्रस्तुत केले. या समारंभाला निजामिया बैतूलमाल आणि वेलफेर ट्रस्टचे अध्यक्ष आसिफ जकाती, जावेद सय्यद, अशरफ मदरंगी, समीर सुतार, मलीक इप्पेरी, मुस्ताक दड्डी, जुबेर मुतवल्ली, मंझूर तिगडी, इमामहुसेन नालबंद, इरफानपाशा, सलमान दंडावत, रफिल जमादार, शहबाज तहसिलदार आदिनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी जावेद सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta