बेळगाव : हलगा ग्रामपंचायतीला नूतन डीएसपी श्रीमती पद्मश्री, बागेवाडीचे सीपीआय तुकाराम नीलगार, पीएसआय अविनाश आणि पीएसआय परवीन बिरादार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यानिमित्त जनसंपर्क सभा देखील पार पडली.
हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सागर कामानाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रा. पं. उपाध्यक्ष सुजाता बडगेर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामपंचायतीला भेट देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे शाल व पुष्पहार घालून हार्दीक स्वागत करण्यात आले. या भेटीच्या निमित्ताने जनसंपर्क सभेचीही आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी आणि गैर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि नागरिक यांच्यात कशाप्रकारे समन्वय असला पाहिजे याबद्दल तसेच नागरिकांना पोलिसांची मदत कशा पद्धतीने मिळू शकते यासंदर्भात मार्गदर्शन केले. जनसंपर्क सभेस बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta