Sunday , July 26 2026
Breaking News

पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या आणि आयजीपी सतीश कुमार यांची बदली

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी राज्यातील पंधरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची बदली करण्यात आली असून ते आता म्हैसूर झोन डीजीपी म्हणून सेवा बजावणार आहेत.
त्याचप्रमाणे बेळगावचे आयजीपी सतीश कुमार यांचीही बदली करण्यात आली असून ते बंगळुरू शहर पश्चिम विभागाचे काम पाहणार आहेत. सतीश कुमार यांच्याकडील बेळगाव आयजीपी पदभार हुबळी पोलीस आयुक्त रमण गुप्ता सांभाळणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *