बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 5000 रुपयांची देणगी दिली. मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेच्या निधीतून गोरगरीब विद्यार्थी किंवा पालकत्व हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक फी भरण्यासाठी मदत केली जाते. सदर योजनेसाठी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आज गुरुवारी 22 जून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या मुलीच्या हस्ते 5000 रुपयांची आर्थिक मदत केली. याप्रसंगी शाळेचे उपाध्यक्ष अनंत जाधव, मुख्याध्यापक गजानन सावंत, धनंजय पाटील, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे व फाल्गुनी धनंजय पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta