बेळगाव : भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या लवकरच चारवर पोहोचणार आहे. सध्या संग्रहालयात 3 वाघ असून आणखी एक वाघीण राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून येथील संग्रहालयासाठी मंजूर झाली आहेत. या तिन्ही वाघांच्या सोबतीला पुढील आठवडाभरात बन्नेरघट्टा प्राणी संग्रहालयातून वाघीण भूतरामट्टीत दाखल होणार आहे. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. डिसेंबर 2022 मध्ये या ठिकाणी टायगर सफारीला सुरुवात केली आहे. म्हैसूर प्राणिसंग्रहालयानंतरचे सर्वोत्कृष्ट प्राणीसंग्रहालय भूतरामट्टी येथे तयार केले आहे. त्यामुळे भेट देणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने या ठिकाणी प्राण्यांची संख्याही वाढविली जात आहे.
भूतरामट्टी येथील प्राणी संग्रहालयाच्या विकासावर भर दिला आहे. या ठिकाणी 12 आसनाची 2 इलेक्ट्रिक वाहने दाखल झाली आहेत. प्राणी संग्रहालयकडून येथील जंगल सफारीसाठी म्हणून लवकरच ऑनलाईन बुकिंग सुरू करण्याचा विचार आहे. यासह येथे संग्रहालयाला भेट देणाऱ्यांसाठी रिफ्रेशमेंट कॅन्टीन सुख केले जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta