Friday , March 6 2026
Breaking News

घटप्रभा नदीतील अनेक मासे मृत्युमुखी!

Spread the love

 

बेळगाव : यावर्षी मान्सून लांबल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची झळ जलचर प्राण्यांना देखील बसली आहे. नदी, नाले कोरडे पडल्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदी कोरडी पडली असून पाण्याअभावी नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच गोकाक तालुक्यातील नल्लानट्टी, बाळोबाला, बिरगानट्टी या गावात नदीतील मासे मृत पावले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मासे कुजलेली दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या बाळोबाला बिरगानट्टी आदी गावात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र या भागात संबंधित लोकप्रतिनिधी किंवा संबंधित अधिकारी फिरकले देखील नाहीत. त्यामुळे जनतेत असमाधान पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्तव्य कठोर… पण मन माणुसकीने ओथंबलेले!

Spread the love  डी डी पी यू श्री एम एम कांबळे यांचे भावस्पर्शी छायाचित्र! बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *