बेळगाव : पाऊस लांबल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सगळीकडे पावसासाठी प्रार्थना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुस्लिम समुदायातर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
बेळगाव येथील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव उत्तर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सामूहिक प्रार्थनेदरम्यान अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल अझीझ काझी यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाजपठण करण्यात आले. जमलेल्या मुस्लिमांनी ‘अल्लाह, दया कर, पाऊस तोडू दे’ अशी आर्त हाक दिली.
शहरातील मुस्लिमांनी आजपासून तीन दिवस पावसासाठी प्रार्थना करण्याचे ठरविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta