बेळगाव (प्रतिनिधी) : मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ जून २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीनंतर कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) च्या नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. सन २०२३-२४ साठी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष म्हणून सी. ए. शशिधर शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सी. ए. शशिधर शेट्टी हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रोटेक इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, रोटरी बेंगळूर उद्योगाचे माजी अध्यक्ष, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१९० चे माझी असिस्टंट गव्हर्नर आणि कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक देखील आहेत.
याशिवाय उपाध्यक्षपदी – एम. जी. राजगोपाल, मानद सचिवपदी – एस. नागराजू, सहसचिव (शहरी) – श्रेयांश कुमार जैन, सहसचिव (ग्रामीण) – एन. अरुण पडियार तर खजिनदारपदी एच.के.मल्लेशगौडा यांची नियुक्ती झाली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष सी. ए. शशिधर शेट्टी म्हणाले, उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कुशल कर्मचारी उपलब्ध होण्यास उपयुक्त असलेल्या दबसपेठ येथील कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) चा सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनोव्हेशन प्रकल्प पूर्ण करण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कर्नाटकातील एमएसएमई (सूक्ष्म लघु आणि मध्यम) उद्योजकांना व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) हे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.