बेळगाव : अनैतिक संबंध अडसर ठरणाऱ्या पतीचा खुन करून
चोर्ला घाटात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. तो मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून मंगळवारी चोर्ला घाटात फेकून देण्यात आलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने अथक परिश्रमाने मृतदेह शोधून काढला आहे.
अनैतिक संबंधाची माहिती पतीला मिळाली त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा पत्नीने आपल्या प्रियकर व त्याच्या दोन साथीदारांबरोबर कट रचला. त्यानंतर झोपेच्या गोळ्या देऊन पतीचा गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह चोर्ला घाटात फेकून दिला. त्यानंतर स्वतःच पोलीस स्थानकात जाऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र त्यांचा हा कट उघडकीस आला असून याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकर व आणखी दोघांना अटक केली आहे.
रमेश कांबळे याचा मृतदेह चोर्ला घाटात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी पावसातदेखील जाऊन त्याठिकाणी तपास केला. खोल दरीत पोलिसांनी उतरून मृतदेहाची शोधाशोध केली. पोलिसांना तो मृतदेह आढळलो. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
संध्या रमेश कांबळे, बाळू अशोक बिर्जे, जय उर्फ सोनू मोहन ससाणे, नितेश महादेव अवळी (सर्व रा.आंबेडकरनगर, बेळगाव) यांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
या सर्वांची चौकशी करून त्यानंतर मृतदेह फेकलेल्या संशयितांना घटनास्थळी नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांनी शोधाशोध केली आहे. पोलिसांना आता मृतदेह आढळला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta