बेळगाव : येथील मराठी प्रेरणा मंचतर्फे बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून यशाचा आलेख उंचावत नेणाऱ्या खानापुरातील ताराराणी हायस्कूलला ‘महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शहर परिसरात शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी, शिवाजी विद्यालय येळ्ळूर, व्हीबीएसएस गर्ल्स हायस्कूल येळ्ळूर, महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर, भावकेश्वरी माध्यमिक विद्यालय सुळगे, मराठा मंडळ हायस्कूल किणये, भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी, महालक्ष्मी हायस्कूल बसरीकट्टी, खादरवाडी हायस्कूल खादरवाडी, नागनाथ हायस्कूल बेकिनकरे, काळम्मादेवी हायस्कूल हंगरगा, माऊली विद्यालय कणकुंबी, माऊली गर्ल्स हायस्कूल गर्लगुंजी आणि नेहरू मेमोरियल हायस्कूल बिडी यांचा समावेश आहे. निवड झालेल्या शाळांचे मुख्याध्यापक सन्मान स्वीकारणार आहेत. गौरव समारंभाची वेळ व ठिकाण अद्याप निश्चित झालेली नसून ती लवकरच कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉ. गोपाळ पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.