
अमित पाटील यांची सचिवपदी तर खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून सलग चौथ्यांदा पंढरी परब यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष राम हदगल होते.
बगीच्या हॉटेल्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पंढरी परब, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोझा, व्हिक्टर परेरा, सुनील गोदवाणी, रवी चौगुले, अल्लाबक्ष बेपारी, एस. एस. नरगोडी, उमेश मजुकर, अरिहंत भल्ला आदी सभासद उपस्थित होते.
प्रारंभी सचिव अमित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून गतवर्षीचा आढावा सादर केला. खजिनदार रवी चौगुले यांनी वार्षिक जमा-खर्च सादर केला. त्याला सर्व सभासदांनी अनुमती दिली. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. अध्यक्षपदी पंढरी परब, उपाध्यक्षपदी गोपाळ खांडे व लेस्टर डिसोझा, सेक्रेटरीपदी अमित पाटील, खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची एकमताने निवड करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta