बेळगाव : जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र, बेळगावच्यावतीने रविवार दि. २ जुलै रोजी मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सद्गुरु वामनराव पै यांचे अनेक नामधारक एकत्र येणार आहेत. या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संगीत जीवनविद्या, नृत्य, गुरुपूजन, प्रबोधन आणि श्री सद्गुरुंच्यावतीने अनुग्रह देण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील प्रवचनकार शैलेश रेगे यांचे ‘या भूमंडळाचे ठायी, सद्गुरु दुजा ऐसा नाही’ या विषयावर प्रवचन होणार आहे. तसेच प्रवेश सर्वांना विनामूल्य असल्याने नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मिशनने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta