अध्यक्ष प्रा. जी. के. ऐनापुरे : उद्घाटक ॲड. रवींद्र हळींगळी
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगाव (कर्नाटक) शाखेचे अधिवेशन रविवार दि. २ जुलै रोजी भरणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात सकाळी १० वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होईल आणि दुपारी २ वाजता होईल. अधिवेशनाची सांगता होईल.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार आणि प्रगतिशील लेखक संघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष प्रा. जी. के. ऐनापुरे (सांगली) हे असतील. अधिवेशनाचे उद्घाटन ऍड. रवींद्र हळींगळी (जमखंडी) हे करतील. या अधिवेशनात विविध विषयावरील ठराव संमत केले जातील. गेल्या तीन वर्षात संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला जाईल. तसेच ऑगस्ट महिन्यात जबलपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड केली जाईल. त्याचप्रमाणे पुढील तीन वर्षासाठी कार्यकारी मंडळ निवडले जाईल. या अधिवेशनात सहभागी होऊन अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन प्रगतिशील लेखक संघाच अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta