बेळगाव : घटप्रभा नदीच्या पात्रात दोन दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा ताबा सुटल्याने ते नदीत पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
आवराडी गावातील चेन्नप्पा (30) आणि दुर्गव्वा (25) हे दोघे पाण्यात वाहून गेले आणि आवरडी गावातून महालिंगपुर येथे जात असताना ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाने चेन्नप्पा आणि दुर्गव्वा नदीत शोध घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta