बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक दैवज्ञ यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धा शुक्रवार दि. २८ जुलैपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धा १५ दिवस चालणार आहेत. स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध मैदानांवर आयोजन कण्यात आले आहे. १० ऑगस्टपर्यंत विभागीय स्पर्धा संपून तालुका स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पिईओ जे. बी. पटेल यांनी दिली.
कर्नाटक दैवज्ञ स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शहापूर विभागीय माध्यमिक शालेय क्रीडा शिक्षकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख म्हणून शहर शारीरिक शिक्षणाधिकारी जी. बी. पटेल, मुख्याध्यापिका गोपिका कदम, शहर माध्यमिक शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, सचिव उमेश कुलकर्णी, उपप्राचार्या आशा शिंदे, अनिल मुगळीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. २०२३- २४ च्या माध्यमिक विभागीय शहापूर क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक ठरविण्यात आले.
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका गोपिका कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर वेळापत्रक ठरविण्यात आले. शुक्रवार दि. २८ जुलै रोजी योगासन व बुध्दीबळ – बी. के. मॉडेल स्कूल, १ ऑगस्ट रोजी फुटबॉल लेले मैदानावर, २ ऑगस्ट रोजी शटल बॅटमिंटन – ओरिएंटल स्कूल, ३ ऑगस्ट रोजी हँडबॉल कर्नाटक दैवज्ञ, ४ ऑगस्ट रोजी हॉकी-लेले मैदानावर ७ ऑगस्ट रोजी क्रिकेट व्हॅक्सिनटेपो मैदान, ९ ऑगस्ट रोजी थ्रो बॉल व व्हॉलिबॉल- बालिका आदर्श, १० ऑगस्ट रोजी कब्बडी व खो-खो जेल स्कूल- वडगाव ऍथलिटेक्स स्पर्धा २० ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर होणार आहेत. त्याशिवाय जलतरण, कराटे, ज्युडो, कुस्ती, जिमनॅशियम, लॉन टेनीस, नेटबॉल आदी स्पर्धा जिल्हा पातळीवर होणार आहेत.
यावेळी उमेश कुलकर्णी, मॅथ्यु लोबो, बी. बी. देसाई, एन. एम. पाटील, आर. पी. कांबळे, सुधीर मानकोजी, एस. जी. बोगार, प्रकाश किणेकर, एस. आर. नरसण्णावर, एम. आर. मगदूम, निरंजन कार्लेकर, जी. पी. हणमंत, ए. व्ही. देसाई आदी उपस्थित होते. शेवटी अनिल मुगळीकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta