बेळगाव : 24 जुलै 1943 आली स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा बाबू काकेरु यांना आज बेळगावात अभिवादन करण्यात आले. हुतात्मा बाबू काकेरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील काकेरू चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी जाएंट्स अध्यक्ष संजय पाटील, मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिर्जे, म. ए. समितीचे नेते मदन बामणे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, ऍडव्होकेट मोहन सप्रे यांनी हुतात्मा बाबू काकेरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी वीर हुतात्मा बाबू काकेरु यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नजीकच्या काळात काकेरू चौकात हुतात्मा बाबू काकेरू यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात उपस्थित मान्यवरांनी एकमत दर्शविले. या कार्यक्रमाला प्रताप काकेरु, मोहन शिंदे, हिरालाल चव्हाण, पवित्रा हिरेमठ, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजू उंडाळे, पत्रकार श्रीकांत काकतीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. संतोष होनगल यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …