बेळगांव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत टिळक जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती व त्यांच्या तत्त्वांचे शालेय शिक्षकांनी प्रेरणा कशी घ्यावी याची माहिती दिली. याप्रसंगी चंद्रकांत तुर्केवाडी, विनीता देशपांडे, मीनाक्षी जाधव, सुप्रिया चक्रे-भराटे, सुरेखा शहापूरकर व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
