चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घात-पात घडून येत आहेत.
कोवाड, जांबरे, काणूर, पाटणे फाटा, अडकुर या भागात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पूरजण्य परिस्थिती पहायला मिळाली. धरण, बंधारे, नदीलगतच्या शेती, मोरी पूर्णपणे तुडुंब भरलेल्या असून काही ठिकाणी लोक धोका टळावा याकरिता स्थलांतर करत आहेत. त्यामुळे धरणप्रकल्प नजीकच्या गावांतील ग्रामस्थांनी वेळीच धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
