खानापूर (प्रतिनिधी) : कापोली के. जी.च्या ता. खानापूर येथील शेतकऱ्याचा शेतातील विजेची मोटर बाहेर काढताना विजेचा धक्का बसुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरविंद शंकर देसाई (वय ४२) हे आपल्या शेतात पुरामुळे वीज मोटरीचे नुकसान होऊनये म्हणून स्टार्टची पेटी बाजुला काढताना विजेचा धक्का बसुन जागीच ठार झाले.
नंदगड पोलिसाना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहिण असा परिवार आहे.
त्याच्या मृत्यूने कापोली के.जी. गावावर शोककळा पसरली आहे.
