बेळगाव : बेळगाव शहरातील हुंचेनट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक आज शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून अरबाज मुल्ला (वय २५, रा. मच्छे , ता. बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, गुरुवारी रात्री अभियांत्रिकी महाविद्यालयामागील आवारात मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांचे भांडण झाले. या गोंधळातच तरुणाचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. मृत्यचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गांजा किंवा दारूच्या नशेतील तरुणांचा वाद विकोपाला गेल्याने तरुणाचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शेखर एच. टी. आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ठसेतज्ञ तसेच श्वानपथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta