बेळगाव : राज्य सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला 170 रु. शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय झाली आहेत. तर काही लाभार्थ्यांची बँक खातीच नाहीत अश्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोचविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम लाभार्थ्यांनी 20 जुलै पूर्वी बँक खाते आधार लिंक करावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.
ज्या लाभार्थ्यांची बँक खाते निष्क्रिय आहेत अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित रेशन दुकानदारांकडे उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारांकडे चौकशी करावी आणि बँक खाते सुरळीत करावी. जिल्ह्यात 11 लाख लाभार्थी आहेत. यापैकी 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांची बँक खाते निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्नभाग्य रोख रक्कम योजना अडचणीत येऊ लागली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार एक कुटुंब प्रमुखाच्या खात्यात तब्बल 46 कोटी 54 लाख 18 हजार 520 रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta