बेळगाव : अमावस्येनिमित्त मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात घडली.
शंकर सिद्धप्पा जगमट्टी (२७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर सिद्धप्पा जगमट्टी याची मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे .
या हत्येमागे पत्नीच्या प्रियकराचा हात असल्याचा संशय असून, मूडलगी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta