Wednesday , March 4 2026
Breaking News

फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

Spread the love

 

बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची तक्रार ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विणा या महिलेचे वाघवडे क्रॉस येथे कपड्याचे दुकान असून नेहमीप्रमाणे सोमवारी दिवसभर दुकानाचे काम संपून रात्री दुकान बंद करून घरी जातीवेळी मच्छे येथे असलेल्या माऊली हॉटेल नजीक येताच पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून 28 ते 30 वयोगटातील दोघां तरुणापैकी मागे बसलेल्या युवकांनी चालत येऊन एका हातात चाकूने धाक दाखवून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेऊन पलायन केले.

यावेळी या महिलेने आरडाओरड केली असता तेथे जवळपास असलेले नागरिक जमा होईपर्यंत दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस देताच पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आणि पुढील तपास सुरू केला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *