बेळगाव : टिळकवाडी येथील दोन घरफोडी प्रकरणांचा छडा लावताना टिळकवाडी पोलिसांनी एका चोरट्याला गजाआड केले असून त्याच्याकडील 4 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी चोरट्याचे नांव अनिलकुमार मिसरीलाल राजबार (वय 36, रा. बोदारी, उत्तर प्रदेश) असे आहे. गेल्या कांही दिवसांपूर्वी टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या हद्दीतील भाग्यनगर येथील एका घरातील तसेच मृत्युंजयनगरातील आणखी एका घरातील सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास कार्य हाती घेऊन अनिलकुमार राजबार याला पकडले. त्याला कस्टडीत घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडील 4 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात करून पोलिसांनी पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta