बेळगाव : येळ्ळूर येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने येळ्ळूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती समजतात रात्री उशिरा पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपास चालू केला आहे. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे
चांगळेश्वरी गल्ली येथील संभाजी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस ते अर्भक ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ही बाब तेथील नागरिकांच्या निदर्शनास आली. काही जणांनी जवळ जाऊन पाहणी केली असता सदर अर्भक मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी तात्काळ ही बातमी ग्रामीण पोलीस स्थानकाला कळविली. त्यानंतर रात्री उशिरा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृत अर्भक ताब्यात घेऊन परिसरात चौकशी केली. मात्र अद्याप कोणतेच धागेदोरे सापडले नाहीत. ग्रामीण पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे येळ्ळूर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta